Pahila Paus | पहिला पाऊस

Pahila Paus | पहिला पाऊस :- ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .

 

☔ पहिला पाऊस  ☔

पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा
☔☔☔☔☔
🌹तृप्ति समीर टिल्लु 🌹

 

Pahila Paus

9 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *