Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita

मी हया कवितेत एकमेकांची साथ आणि त्यात असलेला गोडवा सांगीतला आहे . ही कविता प्रेम, काळजी, विश्वास यावर आधारित आहे.

साथ  सोबत
🌹🌹🌹🌹🌹🌹

खुप प्रेम करणारा
पण व्यक्त न करणारा
न बोलता मात्र
सगळ काही समजवुन देणारा
🍃🍃🍃🍃🍃
त्याच ते प्रेम
त्याचा तो विश्वास
त्याच ते हसण अन्
त्यात गुंतलेला माझा श्वास
🍃🍃🍃🍃🍃
त्याचा तो राग
जणु लोकांसाठी वाईट
पण मी मात्र
त्याची फेवरेट साईट
🍃🍃🍃🍃
चार लोकांमधे तो
कधीच बोलत नाही
त्याच ते वागण
मात्र कोणालाच समजत नाही
🍃🍃🍃🍃🍃
नाती सांभाळन जणु
त्यानेच मला शिकवल
मी मात्र त्याच्या शिकवणीत
माझ मन हरवल
🍃🍃🍃🍃🍃🍃
कधीतरी तो हळुच
दुखवुन जातो
त्याच्या त्या दुखवण्यात
प्रेमाचा पाऊस पाडुन जातो
🍃🍃🍃🍃🍃
त्याची साथ
आणि माझ आयुष्य
दोघांचही प्रेम
हेच आमच वैशिष्ट्
🍃🍃🍃🍃🍃
तृप्ति समीर टिल्लु
🌹🌹🌹🌹🌹🌹

Marathi Prem Kavita
Marathi Prem Kavita
19 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *