Marathi Kavita Aai -Marathi Kavita On Son and Mother Relationship

Marathi Kavita Aai :- मी ही कविता  माझ्या लहान बाळा वर केली  आहे. मी या कवितेत आई ला बाळा बद्दल वाटणारी भावना व्यक्त केली आहे .तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

💐💐आई च मन  💐💐

नाही रे कळणार बाळा
आईच र्‍हदय तुला
आनंदात लाहानाचा मोठा हो
हेच मागण देवाला

आईच मन कधीच कोणाला
कळणार नाही
काळजातली ती हाक
कधीच कोणी ऐकणार नाही

जीव तुटतो रे बाळा
आईचा तुझ्यासाठी
तु फक्त हसत राहा
तेच सर्वस्व माझ्या साठी

कळु दे मला नेहमी
तुझ्या मनातला गोंधळ
मैत्री सारख नात टिकवु
आणि करू मस्त चंगळ

आईच ते रागवण
मनाला नको लावुन घेऊस
तिच ते बोलण
कधी चुकीच नको समजुस

आईच्या मनातल्या भावना
कधी तरी जाणुन घे
तिच ते हसण्या मागच रडण
कधी तरी समजुन घे …. 

                                                           💐💐तृप्ति समीर टिल्लु 💐💐

10 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *