March 29, 2018
Friends Forever
ह्या Friends Forever कवितेमध्ये मी काही मैत्रीचे अनुभवलेले गोड क्षण मांडण्याचा प्रयत्न केला आहे .
Friends Forever
खूप छान होते ते मैत्रीचे क्षण
जे आपण एकत्र घालवले
सुख दुःखानंमध्ये एकमेकांच्या
मन आपले रमवले
कसे गेले ते दिवस
कळले देखील नाही
रोजचं ते भेटणं नसेल
हे मनाला पटतच नाही
तो आपला कट्टा
खूप छान रंगायचा
सगळ्याजणी जमलो की
तो टेबलंही खूप छान सजायचा
खूप घालमेल होतेय
माझ्या मनाची
वेडं मन हे माझं
त्यालाही ओढ ती मैत्रीची
कुठेही असलो तरी
टिकवू नक्कीच आपली मैत्री
एवढं तर ओळखतोच आपण एकमेकांना
हयाची मला तरी आहे नक्कीच खात्री .

5 Comments
Khup sunder😊
Thanks Dear 🙂
Keep it up dear ….. khup chan jamtay
Thanks 🙂
Hey dear khupach mastaaaaa g…